लाडकीचा हप्ता या तारखेनंतरच…मिळनार 4500 रूपये ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांना मिळालेलाच नाहीये. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेमुळे हा लाभ लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आला नाहीये.आता या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर गेला. राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर झाली. त्यामुळे 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती. पण आता निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
खात्यात पैसे नेमके कधी येणार?
महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना 17 जानेवारीनंतर योजनेचा लाभ मिळणार आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 4500 रुपये?
महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा तिन्ही महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
या महिलांचा लाभ कायमचा बंद होणार
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in यावेबसाईटवर ई-केवायसीची सुविधा 18 सप्टेंबरपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर ई-केवायसीची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. ज्या महिला केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचा लाभ थांबवला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा लाभ या महिलांना मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. पण त्यापुढील हप्त्याचा लाभ बंद होण्याची दाट शक्यता आहे.
e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी
ई-केवायसीची सुविधा 18 सप्टेंबरपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर ई-केवायसीची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे असंही मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.